महिला सक्षमीकरणासाठी निखिल बुडजुडे यांचे पाऊल — प्रभाग २२ मध्ये मार्गदर्शन शिबिर व मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन - Thane 24 Taas

Monday, October 13, 2025

महिला सक्षमीकरणासाठी निखिल बुडजुडे यांचे पाऊल — प्रभाग २२ मध्ये मार्गदर्शन शिबिर व मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख व टेंभी नाका चरई शाखाप्रमुख निखिल बुडजुडे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २२ मधील महिलांसाठी आणि महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर तसेच “सखी नो खेळात जीव रंगला” या मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम खारकर आळी येथील महाजन वाडी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला शिवसेना खासदार नरेश म्हस्के, उपनेते निलेश सांबरे, महिला आघाडी प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेविका पल्लवी कदम, माजी नगरसेविका पूजा वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, ठाणे उपजिल्हा प्रमुख महिला वंदना डोंगरे, तसेच समाजसेविका नेहा बुडजुडे, शाखा संघटिका अदिती भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा तळवळकर, रसिका वेंगुर्लेकर आणि गौरी किरण यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत निखिल बुडजुडे यांनी बचत गटातील महिलांसाठी माहितीपूर्ण मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. या शिबिरात बचत गटांमधील संधी, उपक्रम आणि स्वावलंबनासाठी महिलांनी कोणती पावले उचलावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सखी नो खेळात जीव रंगला” या कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक पारितोषिकांची सोय करण्यात आली होती.
🏆 प्रथम पारितोषिक – पैठणी आणि सोन्याची नथ
🏆 द्वितीय पारितोषिक – वॉशिंग मशीन
🏆 तृतीय पारितोषिक – ओव्हन
तसेच सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
महिलांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंद आणि मैत्रीच्या वातावरणात पार पडला. आयोजक निखिल बुडजुडे व नेहा बुडजुडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.--- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment