ठाण्यात एफ-टॅम सेंटरचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन - Thane 24 Taas

Monday, October 13, 2025

ठाण्यात एफ-टॅम सेंटरचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन




ठाणे---- वसंतविहार परिसरातील रींगल प्लाझा येथे फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने एफ-टॅम सेंटरचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष जगनबाबू गंजी, राघव राव, विष्णू वर्धन रेड्डी, एम.एस. राव, अशोक कांते, सुभाष माचा,ऐश्वर्या, किरणमयी, विष्णू रेड्डी,आदी मान्यवर उपस्थित होते.रींगल प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आलेले हे एफ-टॅम सेंटर सर्व समाजासाठी खुले असून, ४५० चौरस फूटांचे बहुउद्देशीय मिनी हॉल आणि ३०० चौरस फूट अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या केंद्रात हाय-स्पीड वाय-फाय, लॉकर, कार्यस्थळ, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कोचिंग सुविधा, प्रशिक्षण वर्ग आणि उद्योजकता विकास (EDP) कार्यशाळा मार्गदर्शक जयेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत.तसेच ड्रोन तंत्रज्ञान शिक्षण, ड्रोन असेंब्ली व पायलट परवाना अभ्यासक्रम, ट्युशन शिक्षकांसाठी जागा, क्रॅश कोर्सेस, संध्याकाळी व आठवड्याच्या शेवटी सामुदायिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, योग सत्रे इत्यादी उपक्रम देखील या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.याशिवाय ‘तेलगू आई व मराठी मावशी’ या अभिनव संकल्पनेतून महाराष्ट्रात राहणाऱ्या तेलगू बांधवांना तेलगू भाषा शिकवणे तसेच महाराष्ट्रात नोकरी-धंद्याच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांना मराठी शिकवण्याचा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे.संस्थेच्या वतीने गोशाला निर्मितीचे कामही सुरू असून, रायगड जिल्ह्यात आनंद निलयम ज्येष्ठ नागरिक गृह प्रकल्प 5 एकर राबवण्यात येणार असून इमारतीचा आराखडा मंजूरी मिळाली असून लवकरच काम सुरु होणार असल्याचे अध्यक्ष श्री गुप्ता यांनी सांगितले आगामी काळात या कार्यालयाचे रूपांतर समाज भवनात करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष जगनबाबू गंजी यांनी सांगितले.--- छाया, मनोज सिंह 

अधिक माहितीसाठी 9920528833, 7718825503 संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment