ठाणे -- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळ येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी दिपोत्सव आयोजित केला होता संपूर्ण शक्तीस्थळाला लाईटिंग करण्यात आली होती व आकर्षक आकाश कंदील ही लावण्यात आले होते तसेच दिव्यांच्या रोषणाईने सर्व परिसर लख लखून गेला होता सदर कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी ठाणे शहर संघटिका, माजी महापौर . स्मिता इंदुलकर, विभागप्रमुख संजय भोई, डॉक्टर आशिष वैती, विभाग संघटक राकेश जाधव, विभाग समन्वयक बिपीन गेहलोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा सचिव रवींद्र सोनार, सहसचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष आशिष डोके, महिला विभाग संघटिका संतोषी कोळी, रसिका सुभेदार उपविभाग प्रमुख गणेश मुणगेकर, अजय पवार, सुशील भोईर, योगेश घुमटकर, राकेश राठोड, देवशी राठोड, शाखाप्रमुख परेश कांबळे, आनंद मानकामे, हिमांशू चौधरी, किशोर पाटील, मनसे शाखा अध्यक्ष सत्यजित बापलेकर शाखा संघटिका धनश्री कोळी, अपर्णा भोईर, मनसे प्रभाग अध्यक्ष पूनम सावंत, उपशाखाप्रमुख चेतन मुणगेकर,हेमंत सावंत, परेश गोटेकर, समीर नाईक, मनसे उपशाखा अध्यक्ष निशांत कोळी, युवासेना पदाधिकारी मयूर जैन, वरूण मानकामे, कृतिक पाटील, स्मित घोलप ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत घाटवळ, सुरेंद्र भोई, प्रदीप घो साळकर, नितीन फणसे, अरुण करपे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.--- छाया, मनोज सिंह



No comments:
Post a Comment