ठाणे महानगरपालिका आयुक्त यांचा दालना बाहेर ठाण मांडणार असा इशारा भाजप माजी नगरसेविका मृणाल पेंडसे - Thane 24 Taas

Thursday, October 9, 2025

ठाणे महानगरपालिका आयुक्त यांचा दालना बाहेर ठाण मांडणार असा इशारा भाजप माजी नगरसेविका मृणाल पेंडसे

 



ठाणे ---  एस के जी मोरेश्वर विकासकाने तुळजाभवानी मंदिर लगत सार्वजनिक मालमत्तेच्या जागेवर नगरसेवक निधितून बांधण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता तोडला आहे. तरी या संदर्भात  आयुक्त डॉ सौरभ राव यांनी येत्या दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागावर  तातडीने  कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा  सोमवारी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठाण मांडून बसणार असल्याची माहिती माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी पत्रकारांना दिली. आज  भास्कर काॅलनी येथील तुळजाभवानी मंदिर लगत असलेल्या सेवा रस्त्यावर  नौपाडा कोपरी प्रभाग भाजपचे माजी नगरसेवक  मृणाल पेंडसे,सुनेश जोशी,रक्षा यादव, आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी यांच्या उपस्थितीत आंदोलन छेडले.मागील १५ दिवसापूर्वी  नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत २०१८ साली  माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नगरसेवक निधितून तुळजाभवानी मंदिर लगत सेवा रस्त्यावर बांधण्यात आलेला कट्टा महापालिकेला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न एका रात्रीत तोडण्यात आला होता. या संदर्भात आयुक्त यांना संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात कट्टा तोडणाऱ्यावर कारवाई न करता  उलट या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर गर्दुल्ले,दारूड्यांचा वावर असल्यामुळे  स्थानिक नागरीकांना त्रास होतो, अशा तक्रारी  आजूबाजूच्या काही सोसायटींनी दिल्या होत्या. म्हणून या  कारणास्तव  विकासक एस के जी मोरेश्वर  कट्टा तोडून टाकत असतील तर शहरातील मैदान, उद्यान येथेही नशाकरणाऱ्या लोकांचा  आम्हाला त्रास होतो. अशा आमच्याकडेही तक्रारी येतात.म्हणून आम्ही जाऊन उद्याने तोडायची का ,मैदान ताब्यात घ्यायची.,असा संतप्त सवाल माजी नगरसेविका मृणाल यांनी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला आहे.परंतू  समाजसेवेसाठी बांधण्यात आलेला हा  ज्येष्ठ नागरिक कट्टा विकासकाने  समाजसेवेसाठी तोडला नाही .तर नवीन इमारतीमध्ये  या सार्वजनिक मालमत्तेचा वापर गाळे बांधण्यासाठी केला जाणार असल्याचे मृणाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  तर २०१८ ते २०२५ सहा सात वर्षाचा कालावधी ज्येष्ठ नागरिक कट्ट्याला बांधून झाल्यानंतर आता  अचानक गर्दुल्ले दारूड्यांचा त्रास व्हायला लागला का असा टोला भाजपा उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी यांनी लगावला. तर एस के .जी मोरेश्वरी रियालिटी प्रा लिमिटेड यांच्या आराखड्यात संबंधित ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेत गाळे बांधायचे आहेत म्हणून हा कट्टा तोडून टाकला असल्याचे माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी सांगितले.--- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment