
ठाणे : हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे 80 टक्के समाज कारण 20 टक्के राजकारण या नियमांचे पालन करत महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व ठाणे लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार श्री नरेशजी म्हस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली व ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक प्रितम प्रेमसिंग राजपूत व सिमा प्रितम राजपूत हे प्रभागात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अश्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून तसेच प्रभाग क्रमांक 21 मध्ये नौपाडा विभागात दिपावली निमित्त फराळ बनवण्याचे साहित्य किट चे उदघाटन संसदरत्न खासदार नरेश म्हस्के, यांच्या हस्ते व शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे,ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले त्यानंतर हे किट नौपाडा विभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन 5000 किट वाटप करण्यात येत आहे या किट वाटपाची सुरवात चिखलवाडी, भांजेवाडी येथून करण्यात आली तसेच वास्तू आनंद सोसायटी,येथे ही नागरिकांना या किटचे वाटप करण्यात आले. तर काल संध्याकाळी नौपाडा येथील नागोबाची वाडी, प्रशांत नगर येथे ही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहर प्रमुख हेमंत पवार,ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, उपशहर प्रमुख राजु गजमल, शाखाप्रमुख वसंत कोंडभर, शाखाप्रमुख विजय मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी ही दिवाळी भेट वाटप करण्यात आले शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या किट मध्ये दिवाळी फराळसाठी लागणारे साहित्य त्यात रवा, मैदा, तेल, पिठी साखर, बेसनपीठ,पातळ पोहे, तुप,यांचा समावेश आहे तसेच दिवाळी साठी लागणारे पणत्या, उटणं, मोती साबण हे देखील सोबत देण्यात आलं नागरिकांच्या आनंदात आमचाही सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही दिवाळी साहित्य संचाचे वाटप करण्यात येत असल्याचे शहरप्रमुख हेमंत पवार व समाजसेवक प्रीतम राजपूत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. --- छाया, मनोज सिंह
No comments:
Post a Comment