दिवाळी निमित्त प्रभाग क्र. १२ मध्ये ५००० नागरिकांना रवा-साखर वाटप; वाणी कुटुंबियांचा सामाजिक उपक्रम गाजला - Thane 24 Taas

Thursday, October 16, 2025

दिवाळी निमित्त प्रभाग क्र. १२ मध्ये ५००० नागरिकांना रवा-साखर वाटप; वाणी कुटुंबियांचा सामाजिक उपक्रम गाजला

 

ठाणे -- दिवाळी निमित्त प्रभाग क्र. १२ मध्ये ५००० नागरिकांना रवा-साखर वाटप; वाणी कुटुंबियांचा सामाजिक उपक्रम गाजलादिवाळीच्या निमित्ताने ठाण्यातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये एक अभिनंदनीय सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा प्रदेश सचिव श्री. हेमंत सुधाकर वाणी आणि समाजसेविका सौ. सीमा हेमंत वाणी यांच्या पुढाकाराने या उपक्रमात परिसरातील नागरिकांना मोफत रवा आणि साखर वाटप करण्यात आले.या उपक्रमात सुमारे ५००० नागरिकांनी सहभाग घेतला आणि लाभ घेतला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि सर्वसामान्य कुटुंबांना थोडा दिलासा देण्यासाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हे वाटप केवळ राजकीय कार्यक्रम न राहता, समाजाशी जोडलेली एक जबाबदारी आणि सेवा म्हणून करण्यात आले.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मा. नजीब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नजीब मुल्ला यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना श्री. हेमंत वाणी आणि सौ. सीमा वाणी यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हेमंत वाणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सातत्याने समाजासाठी कार्य केले असून, ते फक्त निवडणुकांच्या काळापुरते कार्यकर्ते नाहीत.”तसेच, त्यांनी एक महत्त्वाचे राजकीय विधान करताना नमूद केले की, “येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वाणी कुटुंबियांचा चेहरा महापालिकेत झळकताना दिसेल.” हे विधान उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरले. हेमंत वाणी आणि . सीमा वाणी हे केवळ राजकीय नेते नसून सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि लोकसहभागातून एक समृद्ध आणि सशक्त समाजनिर्मितीच्या दिशेने उचललेले पाऊल ठरतात आहे. ---- छाया, मनोज सिंह

No comments:

Post a Comment