मर्जिया पठाण यांनी दिला मेंदीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश हा देशातील एकात्मता कधीच भंग होऊ देणार नाही - Thane 24 Taas

Tuesday, October 14, 2025

मर्जिया पठाण यांनी दिला मेंदीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश हा देशातील एकात्मता कधीच भंग होऊ देणार नाही



ठाणे -  कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही, असा दुष्पप्रचार करीत काही हिंदूत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित रहावी, या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरविणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली.

मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र, मुस्लीम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये, असे म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता. तसेच, अनेक दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केले होते.




No comments:

Post a Comment