ठाणे शहरातील जय भवानीनगर वागळे इस्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे सुशोभीकरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Thane 24 Taas

Monday, October 20, 2025

ठाणे शहरातील जय भवानीनगर वागळे इस्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे सुशोभीकरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ठाणे --- ठाणे शहरातील जय भवानीनगर वागळे इस्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे सुशोभीकरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकासकामांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम असल्याचे सांगितले. “ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळे शिवसेनेचे गड म्हणून ओळखले जाते. शहरातील प्रत्येक भागात सुविधा निर्माण करून नागरिकांना चांगले वातावरण मिळावे, हेच आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.माजी नगरसेवक एकनाथ भोईर व माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या उद्यानाचे सुशोभीकरण पूर्णत्वास गेले आहे. उद्यानात महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम, लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळणी, नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारा आरो प्लांट, तसेच भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हिरवाईने नटलेले हे उद्यान नव्या ठाण्याचे आकर्षण ठरणार असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या उद्घाटनाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या वतीने उपस्थित नागरिकांना दिवाळीची खास भेट देण्यात आली.--- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment