%20(1).jpg)
ठाणे – मानपाडा परिसरातील नागरिकांचा त्रास संपुष्टात आला आहे. काही महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला मानपाडा बसस्टॉप अखेर पुन्हा उभारण्यात आला असून,याबाबत वारंवार ठाणे महापलिकेला पाठपुरावा करूनही महापालिका बस थांबा बसवत नव्हती त्यामुळे अखेर हा थांबा स्व. यशवंत रामचंद्र पूर्णेकर मेमोरियल फाउंडेशन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मानपाडा विभागाच्या वतीने उभारण्यात आला.माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या पुढाकाराने व स्वखर्चाने बसस्टॉप उभारण्यात आला. या नव्या बसस्टॉपचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मानपाडा विभागातील आणि गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बस स्टॉप चोरीला गेल्याने नागरिकांना पावसात व उन्हात उभं राहून प्रवास करावा लागत होता. दोन्ही बाजूंनी वाहतुकीचा मोठा ताण असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.नव्या बसस्टॉपच्या उभारणीमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, परिसरात समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांनी पूर्णेकर परिवाराचे आणि संबंधित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.-- छाया , मनोज सिंह
No comments:
Post a Comment