ठाणे – दिवाळीच्या निमित्ताने ठाण्यातील भंडार आळी परिसर उजळून निघाला आहे. शिवसेनेच्या वतीने “आमची भंडाराळी – ठाण्याची बाजारपेठ, आमचा अभिमान” या टॅगलाईनखाली आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. या रोषणाई मुळे परिसरात दिवाळीचा उत्साह अधिकच बहरला आहे.शिवसेना विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक पवन कदम तसेच माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम यांच्या पुढाकारातून ही भव्य रोषणाई साकारण्यात आली आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक दुकाने आहे. त्या बाहेर लावलेल्या रंगीबेरंगी लाईट्समुळे या सजावटीचे अधिकच सौंदर्य खुलले आहे. विविध रंगांच्या प्रकाशझोतांनी सजलेल्या या भागाने ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले असून, अनेक नागरिक रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भंडारी आळीत गर्दी करत आहेत.या दिवाळीच्या झगमगत्या वातावरणामुळे ठाण्यातील बाजारपेठ नवचैतन्याने उजळून निघाली आहे.--- छाया, मनोज सिंह
.jpg)


No comments:
Post a Comment