दिवाळी फराळ स्टॉल चे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उदघाटन - Thane 24 Taas

Thursday, October 9, 2025

दिवाळी फराळ स्टॉल चे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उदघाटन



ठाणे --- महिला विकास परिवार तर्फे महिलांना रोजगार निर्माण करून देत शहरात विविध ठिकाणी दिवाळी फराळ केंद्र सुरु केले आहेत याचे उदघाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले यावेळी महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार आदींसह महिला उपस्थित होते  ..... छाया,मनोज सिंह  



ठाणे : परिवार इंटरप्राईजेस महिला विकास परिवार ( गृह उद्योग ) तर्फे दरवर्षी महिलांतर्फे ठाण्यातील नौपाडा विष्णुनगर येथे महिलांनी तयार केलेल्या फराळाचा स्टॉल लावण्यात आला आहे यास्टॉल चे उदघाटन आज ठाणे शहर विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टॉल वर भाजणी चकली, शंकरपाळे, करंजी, पोहा चिवडा, बेसन लाडू, तुपातले बेसन लाडू, रवा लाडू, तिखट शेव, महालक्ष्मी चिवडा इत्यादी पदार्थ ट्रान्सफरन्स बॉक्स मध्ये पॅकिंग करून मिळतील सर्व फराळ हा रिटेल भावात मिळणार आहे. यासाठी ठाणेकर नागरिकांनी अवश्य या स्टॉल ला भेट द्यावी असे आवाहन  आ. संजय केळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वैष्णवी पंढरीनाथ पवार यांच्याशी 9152511171 /  8082377711 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे 

सदर कार्यक्रम प्रसंगी महिला विकास परिवाराचे संचालक पंढरीनाथ पवार, राजेश जाधव, विशाल वाघ, J P यादव, संतोष साळुंखे, रामजी पांडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे आमदार निरंजनजी डावखरे यांच्या तर्फे विवियाना मॉल येथे दिवाळी फराळ स्टॉल लावण्यासाठी मोठे सहकार्य परिवाराला दरवर्षी मिळत असते. त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment