ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवारात असलेल्या आदिवासी बांधवांचे दैवत तारपधारी पुतळ्याला आदिवासी बांधवानी पुष्पहार अर्पण - Thane 24 Taas

Friday, October 17, 2025

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवारात असलेल्या आदिवासी बांधवांचे दैवत तारपधारी पुतळ्याला आदिवासी बांधवानी पुष्पहार अर्पण

 

ठाणे --- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवारात असलेल्या आदिवासी बांधवांचे दैवत तारपधारी पुतळ्याला आदिवासी बांधवानी पुष्पहार अर्पण करून तारपा पुतळ्याचे पूजन करून तारपा नृत्य करत मोठ्या उत्साहात वसुबारस साजरा केला आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या बतीने दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस आदिवासी परंपरेनुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या आदिवासी तारपाधारी आदिपुरुष अर्ध पुतळ्याचे पुजन करुन व अभिवादन करून कार्यक्रमास एकत्रित जमलेल्या समाजबंधू आणि भगिनींना वसुबारस व दिपावलीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष  हंसराज लक्ष्मण खेवरा यांचे शुभहस्ते तारपाधारी अर्ध पुतळयाचे विधिवत पुजन करण्यात आले. तसेच पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच सदर उत्सवाच्या निमित्ताने तारपा नृत्याचे आदिवासी कलाकारांच्या वतीने सादर करण्यात आले. तत्पश्चात कार्यक्रमाचे आयोजना संदर्भात उपस्थितांना संबोधन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रसंगी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रुपाली भालके यांची उपस्थिती कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवणारी होती. तसेच संघटनेचे पदाधिकारी  अमृत सुरकरसो, तुकाराम वरठा, हेमंत जाधव, रमेश डोळे, निलेश महाले, जितू भोये, शिवाजी धामोडे, हरि पागेरा, केशव भोये सुनिल भुतकडे, प्रकाश जाधव, रमेश हावरे, सुनिल भांगरे, रामदास चव्हाण, गणेश जनाठे, सौ. निता पागी, अंजली काकरे, प्रियंका महाले, संगिता गभाळे सुषमा सापटे, भारती गावीत, अंजली हावरे, . मिनाताई घाटाळ, सौ. मिना भांगरे इ. महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सदर कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे व ठाणे नगर पोलीस ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभते असे संघटनेचे अध्यक्ष  हंसराज लक्ष्मण खेवरा यांनी सांगितले.--- छाया , मनोज सिंह 

No comments:

Post a Comment